योनीतून रक्त गेलं नाही तेंव्हा......
नुकताच तिचा १२ वीचा निकाल लागला .
जेमतेम गुण न मिळवता ती नापास झाली.
पोरगी मोठी झालेली आहे
हे आईला कळलेच होते
योनीतून जाणाऱ्या रक्ताबद्दल भीतभीत का होईना
पहिल्यांदा तिने आईलाच सांगितले होते
कपड्याच्या घड्या करून , कपडा कसा लावायचा
जेणेकरून ड्रेस वर रक्ताचे डाग लागणार नाही
तो कपडा दिवसातून कितीदा बदलायचा?
हे आईनेच शिकवलेले.....
बाजूची आरती नुकतीच मागल्या महिन्यात पळून गेली होती
तिने १२ वीतच शेण खाल्ले , असे लोक बोलत होते
ती पळून गेली म्हणून
जमाना काही ठिक नाही
असे कारण सांगून
बापानं पोरीले लग्नाच्या बजारात ऊभं केलं
रंग , तोंड, हातपाय दाखवून मात्र ती
लग्नाच्या परीक्षेत पास झाली
लग्न झालं.....
१ पाळी सासरला येईपर्यंत
सासूने तिला नवऱ्याजवळ झोपू दिलं नाही
सासूने आपल्या शंकेचे निरसण केले
ती पोटूशी नसल्याचे.....
पाळी येवून गेली.....
आता सासूने पोराला परवानगी दिली .
आजपर्यंत आईला बिलगून झोपणारी ती
कशीबरे झोपेल जरड पुरूशी अंगाखाली??
तिला भीती वाटणं साहजिकच होतं.
ती त्याला जेवढं टाळत होती
तेवढा त्याच्यातील पुरूषी अहंकार
तिच्या लसलशीत शरीरावरील उंचवट्यांना बघून उचंबळून येत होता...
त्याने पुरेपूर फायदा घेतला
समाजाने लग्न या कायद्याखाली दिलेल्या बायकोवर बलात्कार करण्याच्या मूलभूत अधिकाराचा.....
तिच्या प्रत्येक अंगाला हाता-ओठाने स्पर्श करत ,
दाताने चावत, मऊ शरीरावर ओरबाडे ओडत
शिश्न कोरडं पडेपर्यंत भोगल्यावर
तो थंड पडला.
पण पहिल्या सेक्सच्या वेळी योनीतून रक्त जात असताना
त्याने कित्तेक porn film मध्ये बघितले होते....
पण रक्त न गेल्याचे त्याने मुद्दाम लक्षपूर्वक notice केले
"रक्त गेलं नाही म्हणजे तू तुझी verginity
आधी कुठेतरी breck केली "
हा निष्कर्ष काढून त्याने तिला हाकलून लावली
बापानं बैठक भरवली
नवरा बैठकीमध्ये २०-२५ पाहून्यांत बोलून गेला
की "ती एका नवऱ्याची नाही.
तिला अजूनही कितीतरी नवरे आहेत"
बिचारीचा एवढासा लाजरा जीव काय बोलणार?
पुरावा तरी कुठला देणार , निरपराधी असल्याचा..???
काल तिची मय्यत होती.....
पळून गेलेली आरती सुखी आहे......
✍सुधीर त्र्यें. पाटील
#सुधीरपाटील
( पोस्ट चोरण्याचा प्रयत्न करू नये. लेखनाचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.©)