Sunday, November 19, 2017

वेश्याचे गांव - वाडिया

----------- -------------

        " विकास मॉडेल " म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे एक अग्रेसर राज्य. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी (फेकू व्यक्तीला मा. ही उपाधी लावणेही अयोग्य वाटते आज) जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी तेथे विकासाची मोट रोवली.त्याच विकासाचा जगभर गाजा वाजा झाला आणि हा पठ्ठया २०१४ साली भारताचा पंतप्रधान म्हणून सत्तेवर रोवला गेला.बघायला गेल तर बुडाखालचा अंधार झाकुन फक्त आभाळच दाखवने ही त्याची एक अजबच तऱ्हा.विकासाच्या नावाखाली त्याने साऱ्याच्याच डोळ्यांत धूळ फेकली.त्याने गुजरातचा विकास केला अस तुम्ही म्हंणता.त्याचे समर्थन करणारे त्याची धु धु धुता पण अरे त्याच गुजरात मध्ये 'वाडिया' नावाच्या गावात काय प्रकार चालतो हे माहित आहे का तुम्हाला......? कधी घेतलाय का तुम्ही त्या गावाचा समाचार.....? अरे हो मी तर विसरलोच तुम्ही तर मोदीने देशभर चालू केलेल्या ' फेकू ' नावाच्या उपक्रमात दंग आहात. म्हणूनच तुम्ही वाडिया सारख्या गावाशी अपिरिचित आहात.
       गुजरात पासून ३८१.४ कि.मी अंतरावर असणारे व पाकिस्तानच्या सिमेला लागून असणाऱ्या बानसकंठ जिल्ह्यामध्ये मोडनारे 'वाडिया' नावाचे  एक गांव. हे गांव वेश्याचे गांव म्हणून नावारूपास आलेले. तस म्हंटल तर या गावाची लोकसंख्या फार जास्त नाही जेमतेम ६०० च्या आसपास.पण इथल्या सर्वच घरातल्या महिला,मूली वेश्याव्यवसाय करतांना दिसतात.या गावात वेश्याव्यसाय करण्याची प्रथा ही ८० वर्षापूर्वीपासून रुजली गेलेली आहे हे निदर्शनास येते.वेश्याव्यवसाय करने हा आता त्यांचा दैनंदिन व्यवसायच झाला आहे यावरच त्यांची रोजी रोटी चालते.या गावचा इतिहास बघायला गेल तर इथे रजवाड्यांचे राज्य चालत होते.त्यात काही हौशे गौशे ही होते.राज्य करत असताना काहीतरी मनोरंजनाचे साधन असावे म्हणून तिथे एक नवी प्रथा आमलात आणली गेली.तेथील सर्वच महिलांचे सर्वच अधिकार हिसकावून घेण्यात आले व त्याच्यापासून आपले मनोरंजन व्हावे यासाठी त्यांना वेश्याचा दर्जा देवून वेश्या बनवण्यात आले. या महिलांना हळू हळू सैनिकांनाही खुश करण्यासाठी बोलवन्यात येऊ लागले. इंग्रजांच्या काळात सुरु झालेला हा देहव्यापाराचा धंदा आजगयात पिढ्यांन पिढ्यां तसाच अविरत पुढे चालू आहे.यावर आजपर्यंत कुणीही निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला नाहीये.जे चालू आहे ते तसेच चालू द्यायचे आपणही चव चाखून मोकळे व्हायचे हे अशे.
      वाडिया या गावात वयाच्या १३व्या वर्षापासूनच मुलींना या देहव्यापाराच्या आगीत ढकलले जाते.ऐकताना गलिच्छ वाटनारे हे कृत्य त्यांच्या नाशिबि १३ व्या वर्षिच येते.शिक्षणापासून वंचित.साऱ्याच अडाणी.वयाच्या १२ व्या वर्षीच काही काही मूली आई बनलेल्या दिसतात.ज्या वयात शरीरातल्या आंतरभागांची वाढ होते त्याच वेळेस त्यांना पाळन्याची दोरी हलवावी लागते. त्याच वेळेस त्यांच शरीर परपुरुषाचा बिछाना गरम करत असते अशा वेळेस तुमचे " बेटी बचाव बेटी पढाव " अस म्हणणाऱ्या संस्था कुठे जातात.शेण खायला का...?की पांगळया होऊन पडतात तेव्हा.अशा संस्थावर थूंकतो मी अन्याय,अत्याचार,बलात्कार,लैगिक शोषण कुठे झाल तर तुमच्या अंगातल रक्त सळसळुन उठत.आता उठेल का ते तसंच सळसळुन...?पेटवेन का अजुन एक न्यायाच रान....?गाजवेंन का ते माणूसकीच रणांगण....? नाही गाजवनार कारण तुम्ही षंढ होऊन लुंड मुंड झाला आहात.अंधारात तुमच ताठत पण उजेडात मात्र गोठत.
     १२ व्या वर्षी लग्नासारख्या प्रकाराला सामोरे गेल्यानंतर जीवनाची राखरांगोळीच होते.यातून बाहेर पडायच म्हंटल तर बाहेरही पडता येत नाही कारण सामोरे येते ते अडाणीपण.शिक्षणाचा गंधच लागला गेला नाही तर धड लिहताही येत नाही की वाचताही येत नाही याचाच पुरेपुर फायदा चव चाखनारा घेऊन जातो.येथील पुरुष मंडळीही वेश्याव्यवसायास हातभार लावतात.नवरा,भाऊ,मुलगा,बाप हे सगळेच दल्ल्याचे काम करतात.किती हा लाजिरवाणा प्रकार.आपली आई,बहिन,मुलगी,बायको हिला गिराईक आणून देणे हे त्याचे रोजचेच काम.नात्याला कलंक लावनारी इथली ही परंपरा. इथे मुलगी आईकडूनच शिकते धंदा करायला असच पुढच्या पिढिकडे हे गुण,परंपरा सुपुर्द केले जातात.आणि अविरत पुढे हे कृत्य तशेच चालू राहते. वेश्याव्यवसाय करणे ही कुठली आली हो परंपरा.गुजरात कोर्ट ही यास सहमती देऊन सांगते की, स्वमर्जिने हा व्यवसाय केला तर त्यात कुणीही हस्तक्षेप करु शकत नाही. वेश्याव्यसाय करने हा गुन्हा मानला जातो पण गुजरात सारख्या राज्यात याला दुजोरा दिला जातो ही खूपच दुर्देवी गोष्ट आहे.कुठलीही महिला स्वमर्जिने हा व्यवसाय करत नाही त्यामागे काहीतरी मजबूरी असतेच.कुणीतरी तिच्यावर बळजोबरी केलेली असते तिच्या मनाविरुद्ध तिच्या भावनाचा छळ केलेला असतो.तिच्या गोजिरवान्या शरीराचा वासनी लिंगपिसाटाने लचका तोडलेला असतो.तरीही शासन याकडे लक्ष देत नाही.आंधळयाची भूमिका घेऊन तेहि कोपऱ्यात पडलेले दिसते.
    इथेले वातावरण म्हणजे खूपच भयानक.अंगावर शहारे येन्यासारखा इथला हा प्रकार.आजुबाजुच्या परिसरातून तशेच शहरातून बडे बडे असामी येऊन वाडीयातल्या वेश्याशी रात रात घालवून जातात.तिथल्या त्या कोमल शरीरावर राजरोस बलात्कार होतो आणि याची कुठेही वाच्यता होत नाही.कुणीच याची दखल घेत नाही. सगळेच हे वेश्याचे गांव बघून गांडीत बोट घालून बसतात.कारण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्या बालिश बालीकांची तेथून सुटका करून देण्यासाठी आमची हातभर फाटत असते तेव्हा.तो फेकू मन की बात सांगत बोंबलत असतो पण त्यांच्याच राज्यात हा वेश्याव्यवसायाचा प्रकार उघडपणे सर्रास चालतो याची कुठे तो हु की चु ही करताना दिसत नाही.त्यांना तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नही करत नाही.त्याने गुजरातचा विकास केला मग या वाडिया सारख्या गावाचा का विकास केला नाही हाच प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कविला पडून राहतो.अहो त्याने तर तुमची  "भाईयो और बहिनो" म्हणून म्हणूनच पार खालूंन वरुन मारली आहे हो.असो.तो राहिला राजकरणाचा मुद्दा.
   वाडियामध्ये चालणाऱ्या या व्यवसायावर येईल का भविष्यात बंदी...?कुणी उचलेल का या विरोधात पाऊल...?वेश्याचे एक दोन घर असते तर ठीक आहे ना पण पूर्णच्या पूर्णच गांव वेश्याव्यसाय करते हे अजबच आहे. ' वेश्याचे गांव - वाडिया ' म्हणून आज ते संपूर्ण जगभर प्रचलित आहे पण त्यावर मज्जाव करण्यास कुणीही जिवंत नाहीये.आता तिथल्या महिलांनाही परपुरुषासोबत सेक्स करण्याची सवय झाली आहे.त्यामुळे त्याही तसंच जीवन जगताना आढळुन येतात.आज जगातल्या मूली उच्च शिक्षण घेऊन उच्च पदांवर कार्य करताना दिसतात आणि वाडिया मधल्या मुली पुरुषांची हौस पूर्ण करताना दिसतात.शरमेने मान झुकून जावी अस हे वाडियातल सत्य.
बाई म्हणून मी जन्माला आले
पण बाई म्हणून मला जगताच आले नाही
रांड म्हणूनच मी समाजात जगवले गेले
आणि रांड म्हणूनच सरनावर चढले गेले
षंढ होऊन तुम्ही तुमचे लंड ठंड केले
पण बंड मात्र कुणीच नाही पुकारले.
___ विद्रोही कवि /लेखक बुद्धभूषण साळवे_____
         नाशिक - ७०४००३४४६०

No comments:

Post a Comment