Saturday, November 11, 2017

'माझी चळवळ'

बेवारीस पडलेल्या मृतदेहासारखी माझी अवस्था ,
आकाशातल्या गिधाडांची चोच माझ्या शरीराचे छीन्न-विछीन्न करत आहे,
रक्ताचा सडा पाण्याच्या विरुद्ध दिशेने जात असताना माझ्या लक्षात आल,
कि माजी चळवळ शांत असलेल्या समुद्राशी नसून तिच्या लाटांशी आहे."


"ढगांचा गड-गडाट आकाशाला फाडणारा विजेचा धसका,
समोरून येणारे जोरदार तुफान आणि,
जमिनीतून निघणारा गरम लावा,
माझा जीव घेण्यास अतोनात प्रयत्न करत आहे,
आता माझी जगण्याची इछाच मेली पण,
जगण्याची इच्छा नसताना माझ्या लक्षात आल कि,
माझी चळवळ जिवंत राहून संकटांना तोंड देण्याची आहे."


विंचूचा डंक शवाला भिडला आहे,
सापाच विष शरीरात गुरमळत आहे,
रक्त वाहण्या बंद होण्याच्या दिशेने आहे,
सर्व अवयवाना हलवणारा मेंदू स्तब्ध होईल,
मन अंगातल कण ना कण शोषून घेईन,
हात पाय गार पडतील,
आता शेवटचा श्वास मुग्ध घेऊन डोळे अंधाराकडे जातील,
तेवढ्यात अंधारातून जाताना एक काजवा दिसला,
अंधाराला आणि काळोखाला,
मिटवण्याच बळ जर त्याच्याकडे आहे,
तर हीच माझी चळवळ आहे.

Atul Kharat

No comments:

Post a Comment