डावे, सेक्युलर व पुरोगामी चळवळीतले लेखक, कवी, आर्टीस्ट, फिल्म मेकर्स, जरनालिस्ट्स आदी लोकांचा एक सॉलिड क्लास असतो. त्यांचा एकूण अटायर, त्यांचे कपडे, आयग्लेअर्स, सॉल्ट-पेपर लुक्स दिलेले केस, मस्त फ्रेंच कट, अरमानी परफ्युम्सचा सुगंध, तोंडात सिगार आणि बोलताना हाय-फाय इंग्रजी. यांच्यासोबत संध्याकाळी ऑपेरा हाऊसमधे जॅझ ऐकत व उंची स्कॉचचा आस्वाद घेत जगभरातल्या साहित्य, कला, संस्कृती, इतिहास, विज्ञान आदी विषयांवर मारलेल्या गप्पांमधे रंगण्यात एक वेगळीच मजा असते. येथे बुद्धीची मशागत होते. आपली विचारसरणी दुसऱ्यावर थोपवण्याचा अॅरोगन्स यांच्यात कुठेच नसतो. आपल्याही ज्ञानाची कसोटी लागते. उथळ व संदर्भहिन चर्चा येथे होत नाहीत.
याउलट, टोकाची उजवी विचारसरणी असलेले हिंदूत्ववादी, इस्लामिस्ट, संघी, मोदूभक्त, भाजपाई, ओवेसिस्ट, बजरंगी इत्यादि कॅटेगरीतले लोक हे टिपीकल 'गावठी' म्हणजे हिंदीत 'देहाती' टाईप असतात. हे जवळ आले तर यांच्या अंगाला शेणा-मुताचा किंवा चोरबाजारातून विकत घेतलेल्या उग्र घाणेरड्या अत्तराचा वास येतो. ड्रेसिंग सेन्सचा आणि यांचा काही संबंधच नसल्याने हे नाईट क्लब्समधेही पुजेला घालायचे कपडे व डोक्याला टिळा लाऊन पोचतात, परिणामी विनोदाचा विषय बनतात. इस्लामिस्ट तर यापेक्षाही भयानक असतात. यांच्या जोकरछाप मेंदी लावलेल्या दाढीमिशा, तोकडी सलवार, डोळ्यात सुरमा आणि तोंडात पान-गुटखा असल्या अवतारामुळे यांना तर बुद्धीजीवी दरवाजातूनच हाकलून देतात. संघी- मोदूभक्तांची तर बातच निराळी. प्रभातशाखेत बौद्धिक गोमुत्र प्राशन करून आल्यावर आपल्या धडावर दिलेल्या टाळक्याचा स्वतंत्र्य असा उपयोग करण्याची गरज नसल्याची यांची खात्री झाल्याने यांच्याशी वादविवाद करणे निरर्थकच असते. चर्चेत वेदातली विमाने, गणपतीची प्लास्टिक सर्जरी, पहिला टेस्टटूब बेबी कर्ण, महाभारतले अणुविज्ञान किंवा अगदीच हल्लीचा तेजोमहल आदी उदाहरणे घुसवून तुम्ही यांच्याबाबत बाळगत असलेला तुच्छतेचा भाव किती योग्यच आहे याची तुम्हाला जाणीव होत रहाते. बाह्या फाटलेला किंबहुना फाडलेला कुडता हे लोक मोदीस्टाईल म्हणुन मिरवतात यावरुनच यांची फॅशनेबल दिवाळखोरी दिसते. बजरंगी-टनाटनी आदि कॅरेक्टरमधे घुसलेली माकडं तर एक निराळंच प्रोडक्ट असतात. हे लोक बुद्धीजीवींसाठी अस्पृश्य का आहेत हे वेगळं सांगायला नकोच. संध्याकाळी एखाद्या देशीच्या गुत्याबाहेर उकडलेली अंडी विकत घेताना हे हमखास सापडतात. देशीच्या अंमलानुसार यांची देशभक्ती कमी-अधिक होत असते. युज अँड थ्रो म्हणून टिश्यूपेपरसारखा यांचा उपयोग होत असतो.
एकूण काय तर या सगळ्या प्राण्यांच्या सहवासात राहून तुमच्या राहणीमानात व बुद्धीच्या विकासात सकारात्मक बदल होण्याची काडीचीही शक्यता नसल्याने तुम्हाला आपण कुणाच्या बाजूने रहावयास हवे याचा बऱ्यापैकी अंदाज आता आलाच असेलच.
तर यापुढे आपली अक्कल लावा आणि आपला 'क्लास' ठरवा.
( देशहितमें जारी )
No comments:
Post a Comment